सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

 

वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण

संतोष देशमुख हत्या प्रकरण : तीन तास सुनावणी, पुढील सुनावणी ३० ऑगस्टला

शिरीष शिंदे (Shirish Shinde)

बीड : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात सोमवारी तीन तास चालली. या सुनावणीदरम्यान मुख्य आरोपी वाल्मीक कराड आणि दुसरा आरोपी विष्णू चाटे यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला, ज्याला सरकारी पक्षाच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले की, आम्ही वाल्मीक कराडला जामीन का देऊ नये याची कारणे न्यायालयाला स्पष्ट केली, तसेच दुसऱ्या आरोपी विष्णू चाटेने 'माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही' या मागणीवर आम्ही अनेक पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

---

निकम यांनी मांडलेले मुद्दे :

अटकेच्या कारणांवर स्पष्टीकरण : कराडला अटक करताना कारणे सांगितली नव्हती, या मुद्द्यावर आम्ही कराडच्या सही असलेला दस्तऐवज सादर केला.

फोन रेकॉर्डिंगविषयी : सुनील शिंदेने केलेल्या फोन रेकॉर्डिंगबद्दल आम्ही सांगितले की, कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून फोन केल्याची नोंद आहे.

विष्णू चाटेची भूमिका : विष्णू चाटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याने खंडणी प्रकरणात कराडला कशी मदत केली, याकडेही आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधले.

---

आरोपींच्या वकिलांची भूमिका

वाल्मीक कराडचे वकील सत्यवृत्त जोशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. ते म्हणाले, "न्यायालयात जे काही मुद्दे मांडले आहेत, त्यावर भाष्य करता येणार नाही, ते कायद्याला आणि मर्यादेला धरून आहे."

---

धनंजय देशमुख यांचे गंभीर आरोप

मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, "हे मोठे जाळे असून ते तोडले पाहिजे. गुन्हेगारीच्या माध्यमातून अर्थकारण केले गेले आहे. आरोपींची एवढी मोठी दहशत होती की यंत्रणाच त्यांच्या नावावर चालायची." त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपींचे समर्थन करणाऱ्या लोकांना पदावर ठेवू नये, अशी मागणी केली.

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार


शिरीष शिंदे (Shirish Shinde)

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 

सामाजिक न्याय भवन परिसरात आयोजित कार्यक्रमात यावेळी आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्यासह सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी मध्ये पोलीस विभागातील पोलीस उपनिरिक्षक श्रीमती पल्लवी भाऊसाहेब जाधव, पोलीस हवालदार अशोक बापुराव शिंदे, पो.ह. प्रदिप निवृत्ती येवले, पोलीस उपनिरिक्षक श्रीराम रामदास खटावकर, पो.ह. शेख आसेफ शेख शमीम महसूल विभागातील निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, नायब तहसीलदार सचिन सुरेशराव देशपांडे, ग्राम महसूल अधिकारी सलीम शेख, संघर्षकुमार ओवे, सहायक महसुल अधिकारी जितेंद्र साहेबराव जाधव, राहुल रामनाथ बलाढ्ये, मंडळ अधिकारी श्रीमती शितल लक्ष्मणराव चाटे, परमेश्वर त्रिंबक काळे, सरपंच श्रीमती शेख मन्नाबी मुजफर पटेल क्रिडा विभागात क्रिकेटसाठी श्रावणी अजिनाथ तर  दळवी, तायक्वांदोसाठी कु. नयन अविनाश बारगजे, व्हॉलीबॉलसाठी अफताब कुरेशी नौशाद, कबड्डीसाठी महारुद्र मधुकर गर्जे, खो-खोसाठी प्रताप शहादेव तुपे, योगा कु. सभाषिणी विनायकराव वझे, बेसबॉल/सॉफ्टबॉलसाठी आदित्य अरविंद विद्यागर 

तसेच यावेळी अवयव दान करणाऱ्या नातेवाईकांचे देखील यावेळी सत्कार करण्यात आले. यामध्ये श्रीमती कोटुळे कोमल गोकुळदास (पत्नी) व बाबुराव कोटुळे (वडील), अवयवदाता यांचे नातेवाईक प्रविण बालासाहेब निनाले (मुलगा), अवयवदाता यांचे नातेवाईक सुखदेव बाबुराव गायके (वडील), अधिसेविका श्रीमती गिरी रमा गोविंदराव, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रातिनिधीक स्वरूपात डॉ. उल्हास गंडाळ, सुभेदार श्री. बलभिम  किसन चिंचाणे, हवालदार श्री. अब्दुल वाजिद अब्दुल अजीज, कारागृह शिपाई श्री. रामआप्पा भागुजी परळकर, सहायक संशोधन अधिकारी महेश पुरूषोत्तम ठाकूर आदींचा यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. 

यावेळी भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सांस्कृतीक कार्यक्रम देखील पार पडला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल शेळके, ज्ञानेश्वर कोटुळे, अथर्व शेळके यांनी केले. यावेळी लोकप्रतिनीधी, नागरिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार यांची उपस्थिती होती.

सोमवार, १२ मार्च, २०१८

बीड शहरात पोलिस भरतीला सुरुवात, पहिल्या दिवशी झाली 580 उमेदवारांची चाचणी

बीड शहरात पोलिस भरतीला सुरुवात, पहिल्या दिवशी झाली 580 उमेदवारांची चाचणी 

बीडः येथील पोलिस मुख्यालयवर सोमवारपासून पोलिस भरतीला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी 580 उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यात आली. पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शकपद्धतीने पार पडावी यासाठी आवश्यक उपाय योेजना करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे व अजित बोर्‍हाडे या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली ही भरत प्रक्रिया पार पडत आहे.
सोमवारी, म्हणजेच भरतीच्या पहिल्या दिवशी 700 उमेदवारांची चाचणी होणार होती मात्र वेळ संपल्याने 580 उमेदवारांची शारिरीक चाचणी करण्यात आली. त्यामध्ये गोळा फे क, 100 मीटर धावणे, लांब उडी व पुल्अप्स या चाचण्यांचा समावेश आहे. मंगळवार पासून प्रति दिन 1000 उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. भरती दरम्यान कोणातही गोंधळ होणार नाही, कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, 8 हजार 234 उमेदवारांपैकी 53 पदे भरण्यात येणार आहेत. भरती प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह 4 पोलिस उपअधीक्षक, 10 पोलिस निरीक्षक, 60 अधिकारी आणि 300 कर्मचारी असा बंदोबस्त ठेवला आहे. 

आरएफ आयडीचा पहिलाच प्रयोग
रेडिओ फ्रि क्‍वेन्सी आयडेन्टीफि केशन डिव्हाईस (आरएफ आयडी) या चीपचा प्रथमतःच पोलिस भरतीमध्ये समावेश केला गेला आहे. मुंबईसह इतर ठिकाणी सदरील चीपचा वापर केला गेला आहे. उमदेवारांना धावण्यासाठी स्टार्ट व फि निश लाईन येथे सेन्सर लावलेले असतात. उमेदवारांनी धावायला सुरुवात केलीकी आरएफ आयडीची अ‍ॅक्टीव्हेट होते.उमेदवार फि निश लाईनपर्यंत पहोताचला की आयडी बंद होतो. त्यामुळे स्टार्ट व फि निशमधील मायक्रो सेकंदही मोजले जातात. त्यामुळे कोणात उमेदवार किती वेळात पोहाचला याची अचूक नोंद घेतली जाते. चाचणी होताच कॉम्प्युटरवरुन लगेचेच उमेदवारांना त्यांचा धावण्याचा टायमिंग कळतो. 

March 12, 2018

  वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरण : तीन तास सुनावणी, पुढील सुनावणी ३० ऑगस्टला शिरीष शिंदे  (Shirish...